फाटक दान

आठवतये ग मला तुझ ते जुनेपण,
तुझ्या हर एक शब्दात गुंतलेल माझ वेड मन,

किती किती सुख वाटायचं तुला पाहिल्यावर,
तुझी पावले  किती पवित्र वाटायची तू गेल्यावर ,

मन माझ स्वार्थी भोळ मंदिरात तुलाच का मागायचं,
संध्याकाळच्या आरतीतही तुझाच जप करायचं ,

मनी मी तुझ्याशी दिन रात खूप काही बोलायचो ,
तू समोर येता डोळ्यात तुझ्या मी मलाच विसरायचो.

तेव्हा कळलाच नाही रोगाला ह्या प्रेम म्हणतात,
जीव पुरा गुंतला आता आठवणीनेच दिवस भरतात,

तू लक्ख चांदणी अन क्षुद्र मी काजवा,
प्रेम भस्म मी देव तुझ्यातच माझा सावळा,

कोजागिरीच्या लक्ख चंद्रापरी तू आजही आठवे,
तुझ्या आभाळात माझी एकही चांदणी नाही यात जरा मला शंकाच वाटे,

तुला शेवटच भेटाव म्हणून मी लाखाचा नवस केला,
विसरलोच होतो मी तू माझ्यातच होती अन मी उगाच प्रवास केला,

आज मंदिरात मी खरच काही मागितला नाही,
माझा देवच मला भेटणार होता यातच मिळवले सारे काही,

तू नदी मंजुळ मी टाकाऊ दगड,
याही जन्मी आपली भेट वाटे मला अवघड,

आलो पुढच्या जन्मात तर तोही तुझ्यावरच अर्पण,
तू राहा सुखी सदा तुजसोबत सावली मी दर्पण,

फाटलेल का असेना तुझ्या वहीत असू दे माझाही एक पान,
माझ सुखायुष्य तुला लाभू दे एवढाच माझ फाटक दान.......

------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत