क्षुद्र ब्रह्मांड
क्षुद्र ब्रह्मांड
उनाड ह्या दिसात मी
सुनाड गीत गायचे
मनातल्या डोहात मी
मृत सूत पाळायचे
जळेल मी उरेल मी
रिते ऋतु रुजवायचे
डोहात ह्या बुडेल मी
मातीतच का मुरायचे
चितेवरि जितेन मी
जळणार्यांनि मग हरायचे
विझुनहि झुरेल मी
जिवितांनि मग मरायचे
उठेल मी सुटेल मी
विजेत्यांनी मग संपायचे
पुन्हा पुन्हा पेटेल मी
सुस्त सुर्य माळवायचे
जखमांचे आभाळ मी
अश्रू का ढाळायचे
वीज होऊनि मलाच मी
अनंत मग जाळायचे
अस्त मी परास्त मी
युगे युगे जन्मायचे
अंत मी अनंत मी
विरेल जेव्हा विश्व जिंकुनी
नसूनहि असेन मी
क्षुद्र ब्रह्मांडाने मोक्षायचे
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM