अमर रस्ते
अमर रस्ते
देउन तर बघ वादळी हुंकार
गर्जन कर सिंहाची मार प्रहार
तुझ्याही रक्तात पडू दे ठिणगी
स्वप्नसागर पेटू दे अग्निपंखाणी
तुझ्याही कणाकणात ईश्वराचे कण आहे
कर्म तुझे भविष्य बाकी नशीब म्हणजे खेळ आहे
वीज होऊनी एकदा कोसळुन तर बघ
नदी होऊन सागरात मिसळुन तर बघ
मार्ग यशाचा तयार कधीच नसतो
काटे लाख वेचुन विजयपथ सजतो
यश विजय असे काही नसते
तुझा प्रवास तुजपर्यन्त असे गुपित असते
मृत्युलाहि जिंकशील तु शोधुन तर बघ अमर रस्ते.
अजुन कविता जगण्यासाठी भेट द्या:
ahammarathi.blogspot.com
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM