एकटेच किती जळायचे
आज हा दिस तुझा तुजसाठी कोरावी कोर चांदवाची
द्यावी तुजला नाहीतर नजराणी नक्षत्रांची
पन मी फकीर फाटका काय देउ तुजला भेट घे हि तेवढी प्रेमाची
जिंकण्यास काये करावे अर्पण तुजला चिंतेत मी होतो
हसलोच जेव्हा आठवले मला मी तर केव्हाच हरलो होतो
खरच ग कसे द्यावे तुजला प्रेमाचे मी पुरावे
देह्भान तुजपाशी माझे सुखसागर तुझ्यात रिते व्हावे
तो पहिला क्षण जेव्हा पाहिले मि तुला होते
तेव्हाच खरा मी जन्मलो होतो बाकि तर सारे वय खोटे
उगाच नव्हता तो मुखवटा तुला नव्हते दुखवायचे
सांगुन तुजला भाव माझा तुला ना दुर करायचे
नव्हता तो मिजास माझा ना स्वभाव असा कधी
स्वार्थासाठी मैत्री नव्हती तुला गमावण्याची फक्त भीती
म्हंटल अजुन थोडे दिस जावे
नाते आपुले घट्ट व्हावे
विचारेन जेव्हा तुला मी जगाने तेव्हा मुके रहावे
तुझ्या प्रश्नांचे सारी उत्तरे मजपाशी नसतिलही
प्रश्न तुला भविष्याचे पडतीलही
प्रेम माझे देइल उत्तरे पुन्हा पुन्हा आताही अन तेव्हाही
विझलो कितिही वादळात तुझ्या पुन्हा पुन्हा पेटेल मी
काय भाव तुझ्या मनातले
कोडे हे मजला न सुटलेले
असतिल भलेही तुझे राजकुमार स्वप्नातले
मी तर तुझा भक्त भोळा देव सारे तुझ्यात रे
जिंकेन हि विश्व सारे येतील जेव्हा हात तुझे हातात हे
जुने दिस ते अमर होऊनि गेले
जगायचे क्षण ते जगुनी गेले
मनातले माझे मनातच विरुनी गेले
गुंतलो तुझ्यात असा मी रंग तुझ्यात दंगुनी गेले
वेड कि हट्ट कि स्वार्थ कि प्रेम म्हणावे
मिटेल मी हरेल मी सरेल मी मरेल मी पन तुझ्याच सवे जगायचे
डोळ्यातुनी माझिया तुच तुला बघ एकदा
तुझ्याविना जगता जगता संपलो मी कितिदा
आता कर एकदाचा तु फैसला
देऊनि साथ दे मोक्ष मजला
रिता कल्पिता अधुरा एकटा मी चालु किती
साथ दे सुन्या मैफिलीत माझ्या गाठण्या रसिकांची प्रीती
अजुनी लाख खूप बोलायचे
पन सारेच शब्दात कसे ग मांडायचे
डोळ्यांचाच दोष होता त्यांनीच निस्तारायचे
म्हनुनी बघ तु डोळ्यात माझ्या एकदा मी एकटेच किती जळायचे
अजुन कविता जगण्यासाठी भेट द्या...
ahammarathi.blogspot.com
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM