शिवराय गीत

ऋणात जयाच्या पिढ्या समस्त वजा गेले l
कीर्ती तयाच्या सुर्य होऊनी तेजात वाहिलें ll

सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव जाणता राजा शिवाजी शोभलें ॥

तेजनेत्र तिखे दुरदृष्टी गहन लाभले l
शिवराय प्रजेचा कैवारी स्वर्ग जिथे नांदले ll

चतुरचाणक्ष नितीधैर्यी न्यायदंडविले l
जातपात विरहित रयत वागविले ll

अष्टप्रधान शासनी स्वराज्य ते स्थापिले l
पात्यागवत्यांसीहि रक्षिता बळिराजे भुषविले ll

न भुषण मिरविले जहागिरीचे न परछत्रात राबले l
शुन्यातुन विश्व बांधुनी अचंबित जगी घडविले ll

न भुतो न भविष्यती ऐसे बुद्धीवंत जाहले l
मनुष्यवादि कृतीवंत सर्वधर्मसम सामावले ll

रयतेस माणिले मायबाप बीज स्वराज्याचे पेरीलेl
प्रगत शिवविचार जनुकांत पिढ्यांच्या भिनविले ll

न जोखली जातपोत धर्मवर्ण माणुस म्हणुनी परखले l
विक्रमादित्य ऐसे राजे शिवाजी एकमेवाद्वितीय जाहले ll

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा