थेंब कोवळा
थेंब कोवळा
गुनगुनता गीत जरा भाव नयनी ओथंबले
तार हृदयी छेडता सूर मल्हार दाटले
गंधर्व श्रावण थेंब कस्तुरी कोसळले
हिमवर्षात न्हाउनी हृदयी झंकार सोहळे
आभास तुझा इंद्रधनू थेंबात पाहिला
नयनी जरा त्यास झेलता आठवणिंचा मोती वाहिला
ओथंबणारे थेंब कसे पाऊस कि प्रेम म्ह्णावे
क्षणात ओंजळ भरता त्यात तुझे प्रतिबिंब पहावे
पिंपळपान मी दवबिंदुचा तु थेंब खरा
अधीर मी किनारा तु भिजलेला वारा
आठवता प्रेम आपुले तु थेंब कोवळा अन मी चकोर बावरा
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM