कोड न सुटलेल
कोड न सुटलेल
कोण तो काय तो असुन नसलेला कसून बसलेला घाव जो
म्हसणात त्याच्या धग्धगती राख तो
सागरात उसळी सैराट लाट जो
तो सखा जो वैरी ते अमृत जे जहरी
तो अफाट जो सुसाट तो वारा जो लहरी
कैसा खेळ तो मांडे
जीत जो पराजीत तो
धर्निचा नर्क तो स्वर्ग जो इथे नांदे
कोड हे सूटलेल खूपदा रुतलेल
यक्ष तो प्रश्न जो
होत ते फुटलेल मोत्याने नटलेल
ती ओढ जी आस तो दुरावा जो भास
ते प्रेम जे द्वेष ते विष जे आवेश
जे खुप समजलेल येड खुळ ते हरवलेल
न मागता मिळालेल
जीवन ते प्रेम जे अनंत जळालेल
जे असतच पण भेटत नाही
ते नसतच जे रुतत नाही
जे संपल ते सुरुवात
ते प्रेम जे नभात
जी शुभ्र ती उज्वल प्रभात
प्रेम जे प्रेमाच्या प्रेमात.....
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM