भेदांचा श्राद्ध

भेदांचा श्राद्ध

काजव्याला दिव्याची गरज नसते
वादळाला भिंतीची आड नसते

काजव्यास अंधाराची काय भीती
इवल्याश्या पाखराचे स्वप्न तरी किती

पदर रे जातधर्माचा किती दिस टिकणार
भेदाच्या काचा कधीतरी फुटणार

जातीपातिंची ढाल भेकडांस लागते
गरुडझेपेला दृढ पंखांची गरज असते

पावलापावलावर इथे भेदाचे बीज
संपलेल्या मैफिलीत आशेचे हे गीत

माणुसकीला इथे जातिंचा शेक
बुर्सटलेल्या समजाला प्रेमाचा अभिषेक

काय म्हणुनी यास समाज म्हणावा
अपल्यालापेक्षा पशुंनाच माणूस मानावा

खर सांगू तुझ्या माझ्यात एकच दिवा एकच वात
प्रेमाच्या प्रवासात प्रेमाची साथ

जातीधर्माचे आता श्राद्ध घालावे
घुस्मटलेल्या पिंडीला काकस्पर्शावे
निस्सीम ह्या प्रेमाला आता धर्म मानावे

अजून कविता जगण्यासाठी भेट द्या:
ahammarathi.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत