जन्मदिवस तुझा
वाटले न कधीही असे मनाला..
माझिया जिवनी येईल ऐसा क्षण जगायला..
तु असशील अन मी ओरडुन सांगेल जगाला..
हाच तो चंद्र ज्याने घायाळ केल ह्या वाघाला..
मी तरल किरण तु इंद्रधनु काजळ नभाला..
मी असा क्षणोक्षणी राहिल तुझी साथ निभवायला....
तुझ्यात रंगुनी दंगुनी बेभान होऊनि जगायला..
तु दिसावी हसावी अशी चांदणे जशी बरसावी..
भेट तुझी नी माझी कधी न हि संपावी..
बघना एकदा आठवणिंचा गाव माझिया डोळ्यातला..
तु नसतेस आसपास कितीदा समजवावे मी ह्या वेड्या मनाला..
कितीदा लिहिली पत्र मी मनात माझ्या ठाव न तुजला
हि अश्रूंची शाई होती अन हा असा कागद लिहायला..
पण तु अशी समोर येता दगाच देती शब्द मजला..
एकटाच मी मुसाफिर होतो नव्हते कुणी सोबतीला...
तु आलीस अन अर्थ
लाभला जगण्याला..
मी असा हा उधाण वारा ठाव नसे माझाच मला...
तु अशी कस्तुरी दरवळे नभात बनुनी शहारा..
काय सांगु काय देऊ तुजला ह्या तुझिया जन्मदिनाला..
श्वास बणुनी सोबत तुझीया
आस होऊनी मनात तुझिया
आरास होऊनी चांदणे तुझिया
मी तुझ्यात तु माझ्यात
धगधग जशी ठोक्यांची हृदयाला...
तु ओळखुनी आहेस माझिया अबोल स्वभावाला..
मी न बोलता तु ऐकतेस माझीया मनाला..
हा स्पर्श तुझा हि ओढ तुझी अजुनी काय हवे जगायला..
तु अशीच मृगनयनी सोबती रहा संगीनी अजुनी काय हवे मागायला...
खुपस अस खोलवर कितीतरी आहे सांगायला..
पण तुला हे कस जमत मी काहि बोलण्याआधीच समजायला..
सांगतो तुला इतुकेच शपथ समज अथवा ईरादा मनातला...
येतील दुखाचे वारे अन सुखाचे सागर किनारे.
सोडुन जातील स्वार्थी सारे सोडणारे...
कधी उन्हाळे कधी पावसाळे..
भरतीचे कधी उत्सव कधी ओहोटीचे दुखवटे...
कधी खरे चेहरे कधी खोटे मुखवटे...
झूरेल मी विरेल मी संपता संपता तुजसाठी जगेल मी...
कोण राहील कोण जाईल ठाऊक न मजला..
मी कसाही अडखुनी पडखुनी
तुझिया राहील सोबतीला...
तुझे उन्हाळे तुझे दुखवटे आहे मी झेलायला..
अशीच सुखद साथ राहू दे प्रेमाच नात आपुल जपायला...
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM