..अंतयात्रेचा साज....
...अंतयात्रेचा साज....
इवली निवली एक चोच दारात आज आली होती,
घरभर पिंगाटुन उनाडली मजभोवती
इवल्या बिवल्या चोचीवर रंग सारे साठले होते,
काळ्याभोर डोळ्यांमध्ये गर्द पावसाळे दाटले होते
येताना चोचीतल पिल्लु दाराबाहेर सोडल होत केव्हाच,
केविलवाण्या नजरेतून पहात होत ते आईची वाट
काय झाल माय लेकाला मला काही उमजेना,
डोळ्यातल पाणी सोडून तिलाही काही बोलवेना
भुर भुर तिची आत बाहेर चालली,
अंगणातुन घरात ती काडी अन चिखल आणू लागली
घरट तीच बनवत होती एका फुटलेल्या पाईपावरती,
एक नजर काडीवरती एक नजर पिल्लुभोवती
एकदम द्वेष माझा दाटून गेला,
घरात माझ्या घरट बनवायचा माज हिला कुठून बर आला
द्वेषाटलेली नजर माझी तिच्या चोचीकडे गेली,
अंगणातल्या चिखल अन काडिने ती बर्बटलेली
घर सगळ घाण होइल म्ह्णून घरट तीच होत मोडायच,
पाईपाजवळ जाऊन पाहिल तर काम तिच चालु होत जोडायच
घरट तिच्यासाठी ती बनवतच नव्हती,
माझ्याच पाण्यापायी पाईपाला ठीगळ ती लावीत होती
सारा खेळ आता कुठ माझ्या ध्यानी आला,
पावसाटलेल्या तिच्या डोळ्यांचा आता कुठ हिशोब लागला
इवल्याश्या चोचींचा केवढा तो प्रताप मोठा,
विरला द्वेष क्षणात झालो मी क्षुल्लक काजवा छोटा
फुटलेल्या पाईपापायी केल होत तिने पिल्लु दुर,
चिखाळलेल्या चोचीने फुलवला जेव्हा तिने अंकुर
म्हणतच असेल तीही मनात आज,
गंगाटलेल्या चिंब भुमीची करून वाळवंट मानवा वाटली कशी नाहि रे लाज,
बुर्सटलेल्या प्रगतीपायी तुच सजवलाये तुझ्या अंतयात्रेचा साज.
किरण पाटील
अजुन कवितांसाठी भेट द्या: ahammarathi.blogspot.com
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM