स्वप्नाग्नि

स्वप्नाग्नि

जुन्या एका मित्राचा आज फोन आला
विचारल तर म्हणे एकटएकट वाटले म्हणून केला

खुप वेळ मग नुकताच हुंदक्यांचा  आवाज आला
विचारल तर म्हणे मला मी नसण्याचा भास झाला

कोसळत्या अवाजातुन शब्द काही कानी पडले
आवाजात खोल खोल घाव रुतलेले

म्हणाला वाट कठोर अन साथ अंधार आहे
चालु कैसा एकटेपणाचा भार आहे
ऐकुन मीही थोडा रुसलो थोडा हसलो
कारण तोच आजार मलाही आहे

मनातले मीही मग सांगितले
स्वप्नाग्नि आपल्या हृदयी ठेव ऊब त्यांची मिळत जाईल
पडता पडता अडखळता चालतच रहा तेच विजयाचे कारण होइल..

अजुन कविता जगण्यासाठी भेट द्या:
ahammarathi.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत