Posts

Showing posts from 2018

शिवराय गीत

Image
ऋणात जयाच्या पिढ्या समस्त वजा गेले l कीर्ती तयाच्या सुर्य होऊनी तेजात वाहिलें ll सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव जाणता राजा शिवाजी शोभलें ॥ तेजनेत्र तिखे दुरद...

मातीतली हिमालय

Image
हि कविता अर्धवट सोडुन दिली होती.मागे किसान मोर्चात आपला बळिराजा तुफानी चाल करत मुंबईत दाखल झाला होता भल्या रात्री.त्यावेळेस कोणत्याही माणुस म्हणुन जिवंत असणाऱ्याच्या जाणीवेची हजारदा कत्तल व्हावी अशी दशा त्या मोर्चेकरी शेतकऱ्यांची झाली होती. चाबुकासारखे रट्टे मेंदुवर पडुन झिनझिन्या आल्यावर कविता लिहिता लिहिता तशीच अपुर्ण राहिली होती.              मागे पुन्हा दिल्लीच्या बादशहाने चिरडण्याचा प्रयत्न केला,दिल्लीत येणाऱ्या बळिराजाच्या पदयात्रेला. आज पुन्हा येताय मातीतली हिमालय विधानभवनाच्या भिंतीजवळ. येतच राहतील पुन्हा पुन्हा मुर्दाड सरकारांना भुकंपवण्यासाठि. त्याच हिमालयांना समर्पित हि कविता. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तु रात्रीतल ऊन अनुभवल ये का कधी? होरपळणार..लालजर्रत.. हसु नको आता लगेच माझ्यावर.. रात्रीत कसं ऊन असेल? जरा निट बघ तुझ्या जेवणाच्या ताटाकडे.. चपातीतल्या असंख्य सनसनित सुर्यांनी तुझ्या डोळ्यांना अंधारी आली ना? पुन्हा हसतोयस माझ्यावर... अरे हो विसरलोच मी... तुझ्या मेंदुला आता जळमट लागलय विसरण्याच... बरच काहि विसरण्याच.....

पुतळे

Image
पुतळेच चालवतात हा देश. पुतळेच थांबवतात हा देश.. पुतळे आजहि बोलतात.. कुणाच्या तरी विरूध्द विष पेरायला... पुतळे उंच उंच पोहचतात.. कुणाची तरी उंची कमी दाखवायला.. पुतळे सारेच असता...

मैत्री पहाट

 पिंपळपानावर नक्षीचा खेळ बावरा, चंद्रहि भेटे सुर्यहि फुटे पहाटेचा रंग सावळा.. रविकिरणांचा धरणीवरी अभिषेक सोहळा, गार वाऱ्यासंगे गंध मातीचा तो कोवळा... किलबिल सुरेल पाखरा...

सोबत

अल्ल्याड पल्ल्याड सारा सोबतीचा खेळ.. कुणीतरी कुणासाठी जुळतील मेळ.. नदिने तरि असे कितीक झुरावे.. थकलेल्या पाण्याने सागरास मिळावे.. क्षण दोन क्षण असे कितीक जगावे.. अखेरच्या श...

फक्त बरस अन वाहुन जा

तो येतोय.. वाईट काळात दगाबाज ठरलेल्या नात्यांना मुळासकट वाहुन न्यायला.. तो येतोय विश्वासघाताच्या उन्हाने जळुन राख बेचिराख झालेल्या आठवणिंना उगाच विझवायला.. पुन्हा त्य...

असिफा

Image
कठुआ मधील पाशवी अमानवी घटनेने डोक्याला झणानुन टाकलय... ८ वर्षीय असिफाला लाख लाख वंदन अन श्रीनगरमध्ये गच्चाळ धर्मांध जी लांडगी कोल्हि त्या नराधमांच्या बाजुने जय श्रीराम...

जन्मदिवस तुझा

वाटले न कधीही असे मनाला.. माझिया जिवनी येईल ऐसा क्षण जगायला.. तु असशील अन मी ओरडुन सांगेल जगाला.. हाच तो चंद्र ज्याने घायाळ केल ह्या वाघाला.. मी तरल किरण तु इंद्रधनु काजळ नभाला.. ...

गोड गोड बोला

गोड गोड बोला माणुसकिच्या तिळाचा बुद्धिच्या गुळाशी घट्ट पिळ करुन बोला.. त्यांच्याविषयी बोलण्याआधी त्यांच्याशी बोला... टोपीवाल्याशी बोला टिळेवाल्याशी बोला भगवा लाल निळा हिरव्याशी बोला.. बोलता बोलता नोकरी निवारा पर्यावरणावर बोला... झेंडा जरा बाजुला करुन जखमांवर बोला.. तुमच्या त्यांच्या जखमा सारख्याच असतील.. माणुसकी असेल थोडिफार शिल्लक तर माणुस म्हणुन बोला... एक डोळ्याच्या बदल्यात एक डोळा तुला घेता येईल.. जशास तसे करता करता सारा समाज उद्या अंधळा होईल... ते टिळे लाऊन जातील.. हे टोपी घालुन जातील.. झेंडे खांद्यावर देण्याआधी धर्म जातीचा अफु पाजुन जातील.. तुम्हि तेव्हा बोला.. झेंड्याआडुन अजेंडे राबवणाऱ्याचा धिक्कार बोला.. रंगांना रंगाशी भिडवणाऱ्या अडत्यांना नकार बोला.. एवढ सगळ तुम्ही बोलणार नसाल तर लहान बाळाच्या कानात माफिनामा बोला... येणाऱ्या पिढीला देव धर्म जातीत ढकलुन छाती फुगवुन कट्टरतेने घोषणा द्या... तिळगुळ घ्या अन आजपुरत गोडगोड बोला...

अंधार अंधार अंधार

खरच धन्य आजचे पत्रकार सरकार आणि मतदार... पत्रकार पत्रकार पत्रकार... लाचार भिकार चाटुकार... भित्रट पोरकट मक्कार... सरकार सरकार सरकार... कुप्रचार कुविचार हाहाकार... खूनी धर्मांध टु...