मातीतली हिमालय

हि कविता अर्धवट सोडुन दिली होती.मागे किसान मोर्चात आपला बळिराजा तुफानी चाल करत मुंबईत दाखल झाला होता भल्या रात्री.त्यावेळेस कोणत्याही माणुस म्हणुन जिवंत असणाऱ्याच्या जाणीवेची हजारदा कत्तल व्हावी अशी दशा त्या मोर्चेकरी शेतकऱ्यांची झाली होती.
चाबुकासारखे रट्टे मेंदुवर पडुन झिनझिन्या आल्यावर कविता लिहिता लिहिता तशीच अपुर्ण राहिली होती.

             मागे पुन्हा दिल्लीच्या बादशहाने चिरडण्याचा प्रयत्न केला,दिल्लीत येणाऱ्या बळिराजाच्या पदयात्रेला.
आज पुन्हा येताय मातीतली हिमालय विधानभवनाच्या भिंतीजवळ. येतच राहतील पुन्हा पुन्हा मुर्दाड सरकारांना भुकंपवण्यासाठि.

त्याच हिमालयांना समर्पित हि कविता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तु रात्रीतल ऊन अनुभवल ये का कधी?
होरपळणार..लालजर्रत..

हसु नको आता लगेच माझ्यावर..
रात्रीत कसं ऊन असेल?
जरा निट बघ तुझ्या जेवणाच्या ताटाकडे..
चपातीतल्या असंख्य सनसनित सुर्यांनी तुझ्या डोळ्यांना अंधारी आली ना?
पुन्हा हसतोयस माझ्यावर...

अरे हो विसरलोच मी...
तुझ्या मेंदुला आता जळमट लागलय विसरण्याच...
बरच काहि विसरण्याच..
आला दिवस ढकलण्याच...

बर जाऊ दे , निदान ताटातल्या गोलगरगरित देखण्या चपातीतली ऊब तुला विरघळवत आहे ना?

आता गोंधळु नकोस..
इतकाहि तु  खुळा नाहिस..
कितीतरी गुलामांच्या पोटात खड्डे खणुन तुझ्या पोटाचा घेर भरलाय..
काय विचारतोस? कोण गुलाम अन् कसले खड्डे?
हेच ते विसरण्याच ग्रहण...
ज्यांनी झाकली जाताय मातीतल्या हिमालयांची व्रण...

मातीतली ती हिमालय झिजताय दररोज..
तुझ्या माझ्या निर्लज्जतेच्या उन्हाने विरघळताय दररोज..
जमीनदोस्त झाली आता ती हिमालय..
झिजुन विरुन माती झाली त्यांची आता..
हो पण माती कसदार जिवंत आहे अजुनही...
मातीत छाती पेरुन कितीतरी नवे श्वास उगवण्यासाठी..

ढोरमेहनतीच्या घामगंगेने बनलीय हि माती अजुनच सुपिक..
त्याच झिजलेल्या हिमालयाच्या मातीला काल म्हणे लाल वावटळ आपल्या मुर्दाड विकासनगरीत येऊन धडकल..

अनेक हिमालय इथं येईपर्यंत सालपटुन झिजुन गेली...
जखमांनी भळभळणारी कितीतरी लालसुर्य काल पाहिलीच असशील तु...
जर व्यक्तिपुजेत भिजलेल्या नजरांवरती भक्तीचे चष्मे नसतील लावले तु..

कितीतरी सह्याद्रीच्या रांगा कातडिची जमीन उसवुन फोड बनुन ललकारत होत्या त्या हिमालयांना..
जो झिजला होता माती झाला होता...
पण रक्ताटलेल्या घामाने सुपिक जिवंत होता..

तुझ्या विसरण्याच्या ग्रहणात असे कितीतरी सुर्य आता झाकले जातील...
दिल्लीच्या सुस्ताड बोलघेवड्या राजाची भुलभाषणं तुला झोपी लावतील.

हिमालय हि मातीतली भुकंपतील दिवशी एका..
उध्वस्त करतील हर एक शोषणाचा कारखाना..
तु कर जयघोष तुझ्या नेत्यांच्या नावांचा..
मंदिर-मस्जिद अन पुतळ्यांच्या गावांचा..

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत