फक्त बरस अन वाहुन जा
तो येतोय..
वाईट काळात दगाबाज ठरलेल्या नात्यांना मुळासकट वाहुन न्यायला..
तो येतोय विश्वासघाताच्या उन्हाने जळुन राख बेचिराख झालेल्या आठवणिंना उगाच विझवायला..
पुन्हा त्याच पहिल्या दुसऱ्या खऱ्या खोट्या प्रेमाच्या पहिल्या पावसातल्या कुजकट सडलेल्या भेटिच्या आतुरतेला मातीत मिसळवायला..
तीच्या अन माझ्या आठवणींना डोळ्यांच्या कडेवर काठोकाठ भरायला..
तो येईल दर वेळेस सारखा कमकुवत नाजुक अन तात्पुरत्या प्रेमाच्या सरी घेऊन..
मला अधीर करेल .. अस्वस्थ करेल..
ओरखाडे जबरदस्त करेल..
पण ह्या वेळेस तो फक्त पाऊस असेल..
मला आतुन न भिजवणारा..
आल्या सरशी वाहुन जाणारा.
मला ना काहि देणारा अन मी हि त्याला काहि न देणारा..
जा शोध दुसरे नवीन उगवलेली कोवळी रोप..
तुझे लाड पुरवणारी..
तुला प्रेमाचा ऋतु वगैरे मानणाऱ्या त्या फुलपाखरांना..
ढळ इथुन तुझी लायकी फक्त जगवण्यासाठिची ..
नाहि आतुन भिजवण्यासाठीची...
तुझा अन माझा करार मी मोडतो..
सोडुन गेलेल्या..
खोट-नाट नात टिकवणाऱ्या..
सगळ्या मुखवट्याच्या धुर्त लबाडांसकट तुला बेदखल करतो माझ्या शब्दांच्या मालमत्तेतुन.. माझ्या कवितांच्या वारसाहक्कातुन..
बरस अन वाहुन जा..
आलेल्या स्वार्थी पाहुण्यासारखा..
दोन दिवस ये ..
उपकार केल्यागत भेटुन जा..
पण फक्त बरस अन वाहुन जा..
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM