मैत्री पहाट
पिंपळपानावर नक्षीचा खेळ बावरा,
चंद्रहि भेटे सुर्यहि फुटे पहाटेचा रंग सावळा..
रविकिरणांचा धरणीवरी अभिषेक सोहळा,
गार वाऱ्यासंगे गंध मातीचा तो कोवळा...
किलबिल सुरेल पाखरांचा जंगी जोगवा,
बेधुंद करी तो पहाटेचा मदमस्त गारवा...
मलाच मी नवा वाटे पहाटेचा असा भेदक प्रहार,
शहाऱ्यांची गर्दी दाटे त्यात जालिम स्वप्नविहार...
धुके धरणीला हवेतच बिलगे घट्ट,
आभाळा मिठित घेण्या मातीचा हा पोरकट हट्ट..
पात्यांवरची दवबिंदुं पिऊन घेती किरण जिथे..
वारा शिवता ओळखीचा मनकळितुनी मैत्रीच फुल फुटे....
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM