असिफा
कठुआ मधील पाशवी अमानवी घटनेने डोक्याला झणानुन टाकलय... ८ वर्षीय असिफाला लाख लाख वंदन अन श्रीनगरमध्ये गच्चाळ धर्मांध जी लांडगी कोल्हि त्या नराधमांच्या बाजुने जय श्रीराम चे नारे देताय त्याचा निषेध म्हणुन हि कविता.
*असिफा*
कोल्ह्यांचा एक जत्था कर्णकर्कश किंचाळत होता..
जय श्रीराम भारत माता कि जय भुंकत होता..
चिमणिचे लचके तोडुन खाणाऱ्या लांडग्यांसाठि हि कोल्हि भुंकत होती...
आपल्या दाण्यापाण्याला निघालेली चिमणि त्या दिवशी लांडग्यांना गवसली होती..
दातसुळक्यात अडकवुन एका मंदिरात तिला खायच ठरल..
एकेकाने लचके तोडत रक्त पाडल..
एक मोट्ठा दगड त्या मंदिरात कसा गोजिरवाणि बनवला होता..
स्मित हासु भाव दयाळु अन नजर कृपाळु करुन दगड सार पाहात होता...
ह्या देवभोळ्या लांडग्यांनी म्हणे दगडाची पुजाहि केली फाडुन खाल्ल्यानंतर चिमणिला पुर्ण..
बोला जय जय धर्म जय धर्म..
एक नाहि दोन नाहि चार दिवस पुरवुन पुरवुन खात होते..
संक्रांतीच्या दिवशी सारी भुक भागल्यावर पिसाळलेले लांडगे मनोभावे पुजा अर्चा करत होते..
पावण पवित्रच झाल ते मंदिर..
चिमणीच्या रक्ताश्रूंचा अभिषेक दगडावर बेफिकिर..
लांडग्यांच्या मंत्रांनी सार कस झाल ईश्वरी..
चिमणीचा बळी देऊन लांडगे बकले जय हरी जय हरी..
आता ह्या लांडग्यांना सोडा म्हणुन काहि कोल्हे एकत्र जमली..
तिरंगा हातात अन मुखात श्रीराम म्हणत हि धर्मांध विव्हळली..
शत्रुच्या आठ वर्षाच्या चिमणीला खाल्ल म्हणुन काय गुन्हा केला..
लांडगी आमच्याच धर्माची आहेत म्हणुन सोडा त्यांना..
देवधर्मजाती अन अब्रूहारी चिखल लागलाय सडायला...
अंधळा राजा दिल्लीचा बसलाय म्हणे उपवासाला..
सवयीप्रमाणे तुमच्या ती चिमुकली चिमणी तीचा बळी लागाल तुम्हि विसरायला..
म्हणाल मनातल्यामनात दगड करेल बरोबर शिक्षा ह्या नाहितर पुढल्या जन्माला...
ढेकर देत धर्मांध लांडगी कोल्हि निघालीय पुन्हा शिकारीला..
आपली चिमणी घरट्यात येणार नाहि परत ज्या दिवशी तेव्हा ढगाकड पाहुन म्हणा तोच कर्ता अन करविता...
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM