सोबत
अल्ल्याड पल्ल्याड सारा सोबतीचा खेळ..
कुणीतरी कुणासाठी जुळतील मेळ..
नदिने तरि असे कितीक झुरावे..
थकलेल्या पाण्याने सागरास मिळावे..
क्षण दोन क्षण असे कितीक जगावे..
अखेरच्या श्वासाला प्रेमाने गुणावे..
कुणी नसतच मुळी कुणाच हे खर कि खोट..
तुटलेल्या चांदणीला नक्कि काय हव होत..
किति मिळवले किती गमवले हिशोब किती ठेवावे..
प्रेमाने प्रेमाला भागता शुन्यच का उरावे..
काय स्वप्न काय सत्य सारी अंधुकच वाट..
आपण मुके चालत रहावे पाऊलांचा तेवढाच हट्ट..
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM