गोड गोड बोला
गोड गोड बोला
माणुसकिच्या तिळाचा बुद्धिच्या गुळाशी घट्ट पिळ करुन बोला..
त्यांच्याविषयी बोलण्याआधी त्यांच्याशी बोला...
टोपीवाल्याशी बोला
टिळेवाल्याशी बोला
भगवा लाल निळा हिरव्याशी बोला..
बोलता बोलता नोकरी निवारा पर्यावरणावर बोला...
झेंडा जरा बाजुला करुन जखमांवर बोला..
तुमच्या त्यांच्या जखमा सारख्याच असतील..
माणुसकी असेल थोडिफार शिल्लक तर माणुस म्हणुन बोला...
एक डोळ्याच्या बदल्यात एक डोळा तुला घेता येईल..
जशास तसे करता करता सारा समाज उद्या अंधळा होईल...
ते टिळे लाऊन जातील..
हे टोपी घालुन जातील..
झेंडे खांद्यावर देण्याआधी धर्म जातीचा अफु पाजुन जातील..
तुम्हि तेव्हा बोला..
झेंड्याआडुन अजेंडे राबवणाऱ्याचा धिक्कार बोला..
रंगांना रंगाशी भिडवणाऱ्या अडत्यांना नकार बोला..
एवढ सगळ तुम्ही बोलणार नसाल तर लहान बाळाच्या कानात माफिनामा बोला...
येणाऱ्या पिढीला देव धर्म जातीत ढकलुन छाती फुगवुन कट्टरतेने घोषणा द्या...
तिळगुळ घ्या अन आजपुरत गोडगोड बोला...
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM