तुझ पुस्तक
तुलाच मी आत्ता वाचत होतो
वळुन मागे पहात होतो
पान तुझी चाळतांना मी एकसारखा साचत होतो
पहिले पान तुझे एकाच किंकाळिने भरले होते
पहिले सुर तुझे रडगाण्याचे त्यात कोरले होते
थोडे वाचल्यावर पुढे शब्द काहि उमजत नव्हते
बोळक्यातले भाबडे बोबडे तुझे ते बोल होते
बरीचशी पाने वाचतांना हवेने उलटली होती
ओळखी अनोळखी मुखवटे त्यात उमटली होती
एक एक माणस एक एक पान कादंबरीत तुझ्या ओवत गेली
डागाळलेली कुचकट पान तु आपसुकच उसवत नेली
गेल्या कित्तेक पानांपासुन तीनचार नाव सारखी येताये
मैत्रीच्या आकाशात कोरलेली जनु ति सुर्य दिसताये
अलगद त्या सुर्यांचा पुढे संगम झाला होता
जिवापाडच्या जिवलग मैत्रीचा विहंगम तारा मोठा
आठवत नाहि किती पानात तुला मी कोसळतांना वाचले होते
तु मात्र पुन्हा पुन्हा उभा राहिला ठरवून जगाला खोटे
असंख्य पान गुलाबी दिसत होती
कोण जाने कोणती प्रेमीका त्यात होती
पानात पुढच्या गुलाबी जरा कमी होत होती
पण रंग तुझा त्यात पडता रसिकता त्यांची वाढत होती
येणारी पान पुढची सारी सोनेरी होत जाताये
गरुडझेपेची तुझी गाणी त्यात डोकावताये
पान ह्या किताबीची अजुन लाख वाचायची
तुच तुझा भाग्यविधाता ना कशाची भिती
बोट आमची ओळींना तुझ्या एकसारखी आलिंगन देतील
तु जिंकुण विश्व सारे आल्यावर नयन मग हे ओथंबतील
काहि पानात आम्हि असु काहि पानात नसु
तु मात्र चालत राहा आम्हि तुझ्या सोबतच असु
शेवटची पान मात्र आपली साऱ्यांची एकसारखी संपतील
क्षणभर विश्रांती घेऊनी खांद्यावर तुमच्या
मग मोक्ष मिळतील..
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM