बिंदु
आयुष्याच्या प्रवासात नवीन सुरुवात करायला निघालेल्या तरुणांना नाती अन ध्येय यात अंतर तयार झाल्यावर अशाच काहीशा शब्दात ते व्यक्त होत असतील.
---------------------
-बिंदु-
झुळूक वाऱ्याची आज जरा वेगळी भासली
घालून पिंगा मजभोवती नाजुक हसली
सांगयचे होते काहि खास म्हणून झुलत राहिली
उनाड मनात आतुर फुल फुलत राहिली
चालतांना वाटेवरुन आज मन वळणावर गुंतले
पाऊले पुढे पडली मन मात्र तिथेच गुंतले
दिशाहिन होते दिशाही पाऊले माझी अनोळखी वाटती
हिशोब मग थोडक्यात चुकतो नव्याने जुन्याची प्रचीती
प्रवास हा एकसारखा बिंदु भोवती ना सुरुवात ना अंत असे
व्यसन जडले नात्यांचे कि त्यातून आता मोक्ष नसे.
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM