गुलाब

*गुलाब*

प्रेम तिच्या डोळ्यात दुर दुर पर्यंत दिसत नव्हत
तरीच म्हंटल इतक जपुन पेरलेल गुलाब दिवसंदिवस का सुकत होत

शब्दात तिच्या दुर दुर पर्यंत माधुर्य नव्हत
तरीच म्हंटल सुकला गुलाब तरी काट्यांनी का धरुन ठेवल होत

पाउलात तिच्या दुर दुर पर्यंत परत येणारी पाउले नव्हती
तरीच म्हंटल गुलाबाला तुटन्याची का एवढी घाई होती

मला तिच्यातुन हद्दपार ती करत होती
तरिच म्हंटल डोळ्यात माझ्या ती का पहात होती

ती दुर जाणार हे वहितल्या गुलाबाला माहित होते
तरीच म्हंटल तिचे गुलाब माझ्या वहित येताच सुकत का होते

सुकता ये गुलाब आता सुकु द्यावी
होतीये पानगळ आता होऊ द्यावी
दुर जाण्यासाठी का होईना ती पुन्हा येईल परत
अर्धा मी तिच्यात ति माझ्यात राहिल झुरत
सुकलेला का असेना गुलाब मातीतच राहतो मुरत
तरीच म्हंटल गुलाबाला तिच्या मातीने माझ्या घट्ट बिलगता अंतरे का नाहि उरत....

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत