निर्माण

निर्माण

डोहात ह्या खोल खोल मी रुतत जातोय
झिरपत खोल खोल एकसारखा वाहतोय

खोल खोल म्हणजे अस किती खोल
ते इवलेसेपण तो जन्म तो श्वास त्या मागचे पुढचे क्षण सारेच अनमोल

अजुन खोल जातोय मी कदाचित
जखमांनी अंग झाकलय निपचीत

जाव का अजुन खोल?
ह्या उथळपणा मुळेच तर झालाये सगळा घोळ
वरवरच्या वेदना दुतोंडी समाज संवेदना
पिचलेल्या पिढ्या सगळ होईल का मातिमोल?
जाव का अजुन खोल?

जातोच तर आहे मी अजुन खोल खोल
आपले-परके तो-ती काळ-गोर सुख-दुख अबोल-बोल
मी जोडतोय यांना का मीच तुटतोय?
एवढ मात्र खर कि मी गुंततोय!

हे कस शक्यये?
आता वर येण्यात तरी काय अर्थये?
तसहि खोलात कोसळतांना श्वास मी आणलेच कुठे होते?
किती किती हलक वाटतये ते जाणिवांचे मोठे ओझे अन खोटे मुखवटे!

हे अंधाराच्या अलिकडच आहे कदाचित
किंवा अतिउजेडाच प्रायश्चित
तळात मुळात आता मी एकसारखा मुरतोय
जड गहिरेपण जिंकुन पोकळ उंची हरतोय

कितीतरी जण आले असतील ना ह्या खोलीत पहिले?
का असेल प्रत्येकाची एक खोली अन दोन थकलेली पाऊले?

छे! इतेहि जाणीवा आता टोचायला लागल्या
घाव कोरुन रक्ताटलेल्या प्रवासाच्या असंख्य पायऱ्या
ह्या जखमा हा प्रवास हवाहवासा वाटत आहे
सुख,उंची,स्थैर्य,यश,एकसारखेपणा दुर लोटत आहे

मी खरच माझेपण घेऊन आलो असेल का ह्या खोल खोल डोहात?
अपेक्षांची उंची पाडत असेल का मला मोहात ?
का अस्तित्त्वाचा इतिहास खेचतोय मला खोलात ?

असेल असेल त्यांचच षडयंत्र असेल
तसहि मी स्वतः कुठे कधी पाऊले चालवली होती
भविष्याच्या हौसेपोटि किति इतिहासे केली खोटी

नकोच आता शोधायला काहि
सापडलेल जपण्याची
जपुन ते नेण्याची
नेता नेता कोसळण्याची
भिती ठायी
गुंतलो काय किंवा सुटलो काय पर्वा नाहि
निर्माणाकडे जाणार असच खोल अजुनही
पेटेल सारा डोह खुशाल खोल खोल विझेन मी
अणु रेणु कण कण होऊनि खोलवर रुजेन मी
खोल खोल प्राणगीत गाता
आरंभले निर्माण आता
नवा जन्म नवी गाथा

भूकंपली ती जुनी कंपने
आरंभले जे निर्माण आता युगे युगे न संपणे....

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत