सौदा ऋतुंचा
गारठलेल्या गुलाबी हवेत एक सौदा झाला
सहवासाच्या बदल्यात तुझ्या माझे किती श्वास घेऊन गेला
कधीचे न जाणे दुराव्याचे विष मी पीत होतो
किती पावसाळे लोटले तरी ग्रीष्म उन्हाचे गात मी गीत होतो
एक शिशिरच्या बदल्यात एक ग्रीष्मचा सौदा होता
माझे सारेच ऋतू तु जप्त केले ठरवुव सौदा खोटा
अंगभर ऊन्हाळे पांघरून मग मी पेरत होतो डोळ्यांमध्ये पावसाळे
तु मात्र गुलमोहर मोजत होतीस तुडवुन माझी पिंपळपाने
किती वसंत आपण सोबत लुटले होते बहारदार
आता खोटी साक्ष देताये त्या चोरिचे साक्षीदार
करारनाम्यातुन तुझ्या आता ऋतू माझे बेदखल झाले
शरदातल्या चांदण्यात मात्र नजारे तुझे मी जतन केले
किती सदाहरित वने तुझ्या ऋतूंची कर्कातुन माझ्या जात होती
माझा कुंभ होता अभंग अन तु मात्र त्यात भेगा शोधत होती
नुकसानीचे दावे आता किती अन कुणावर ठोकावे
न्यायमूर्तीच जेव्हा कैफात ऋतूंच्या बेधुंद हरवले
प्रेमव्याजासकट भावनांच भांडवल तु घेऊन जा
गुलमोहर नको असेल तुला शरदातला तर निदान हेमंतातली पानगळ तरि तुडवुन जा
काय तर म्हणे सौद्याचा तर स्वभावच असतो तुटण्याचा
तुम्ही चटके द्यायचे खुशाल अन आम्ही एक हुंदकाहि नाहि द्यायचा
हरलेल्या ऋतूंच्या जखमा आता मी जुगारात जिंकतोय
भरपाई तुझी देता देता मी मात्र एकसारखा संपतोय
गिळुन ऋतू जुनी सारी सृष्टी आता संपावी
घेतील जन्म पुन्हा नविन ऋतू नवे अंकुर नवि पालवी
सौदा मीच जिंकेल यंदा लावुन बोलि न भुतो न भविष्यती
ऋतुंसोबत तुझ्या तु तयार रहा सौदा माझ्याशी हरण्यासाठि.....
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM