Posts

Showing posts from June, 2016

क्षुद्र ब्रह्मांड

क्षुद्र ब्रह्मांड उनाड ह्या दिसात मी सुनाड गीत गायचे मनातल्या डोहात मी मृत सूत पाळायचे जळेल मी उरेल मी रिते ऋतु रुजवायचे डोहात ह्या बुडेल मी मातीतच का मुरायचे चितेवरि ...

कोड न सुटलेल

कोड न सुटलेल कोण तो काय तो असुन नसलेला कसून बसलेला घाव जो म्हसणात त्याच्या धग्धगती राख तो सागरात उसळी सैराट लाट जो तो सखा जो वैरी ते अमृत जे जहरी तो अफाट जो सुसाट तो वारा जो ...

फाटक दान

आठवतये ग मला तुझ ते जुनेपण, तुझ्या हर एक शब्दात गुंतलेल माझ वेड मन, किती किती सुख वाटायचं तुला पाहिल्यावर, तुझी पावले  किती पवित्र वाटायची तू गेल्यावर , मन माझ स्वार्थी भोळ मंदिरात तुलाच का मागायचं, संध्याकाळच्या आरतीतही तुझाच जप करायचं , मनी मी तुझ्याशी दिन रात खूप काही बोलायचो , तू समोर येता डोळ्यात तुझ्या मी मलाच विसरायचो. तेव्हा कळलाच नाही रोगाला ह्या प्रेम म्हणतात, जीव पुरा गुंतला आता आठवणीनेच दिवस भरतात, तू लक्ख चांदणी अन क्षुद्र मी काजवा, प्रेम भस्म मी देव तुझ्यातच माझा सावळा, कोजागिरीच्या लक्ख चंद्रापरी तू आजही आठवे, तुझ्या आभाळात माझी एकही चांदणी नाही यात जरा मला शंकाच वाटे, तुला शेवटच भेटाव म्हणून मी लाखाचा नवस केला, विसरलोच होतो मी तू माझ्यातच होती अन मी उगाच प्रवास केला, आज मंदिरात मी खरच काही मागितला नाही, माझा देवच मला भेटणार होता यातच मिळवले सारे काही, तू नदी मंजुळ मी टाकाऊ दगड, याही जन्मी आपली भेट वाटे मला अवघड, आलो पुढच्या जन्मात तर तोही तुझ्यावरच अर्पण, तू राहा सुखी सदा तुजसोबत सावली मी दर्पण, फाटलेल का असेना तुझ्या वहीत असू दे माझाही एक पा...

थेंब कोवळा

थेंब कोवळा गुनगुनता गीत जरा भाव नयनी ओथंबले तार हृदयी छेडता सूर मल्हार दाटले गंधर्व श्रावण थेंब कस्तुरी कोसळले हिमवर्षात न्हाउनी हृदयी झंकार सोहळे आभास तुझा इंद्रधन...

..अंतयात्रेचा साज....

...अंतयात्रेचा साज.... इवली निवली एक चोच दारात आज आली होती, घरभर पिंगाटुन उनाडली मजभोवती इवल्या बिवल्या चोचीवर रंग सारे साठले होते, काळ्याभोर डोळ्यांमध्ये गर्द पावसाळे दाट...

भेदांचा श्राद्ध

भेदांचा श्राद्ध काजव्याला दिव्याची गरज नसते वादळाला भिंतीची आड नसते काजव्यास अंधाराची काय भीती इवल्याश्या पाखराचे स्वप्न तरी किती पदर रे जातधर्माचा किती दिस टिकणा...

स्वप्नाग्नि

स्वप्नाग्नि जुन्या एका मित्राचा आज फोन आला विचारल तर म्हणे एकटएकट वाटले म्हणून केला खुप वेळ मग नुकताच हुंदक्यांचा  आवाज आला विचारल तर म्हणे मला मी नसण्याचा भास झाला को...

एकटेच किती जळायचे

आज हा दिस तुझा तुजसाठी कोरावी कोर चांदवाची द्यावी तुजला नाहीतर नजराणी नक्षत्रांची पन मी फकीर फाटका काय देउ तुजला भेट घे हि तेवढी प्रेमाची जिंकण्यास काये करावे अर्पण तु...

अमर रस्ते

अमर रस्ते देउन तर बघ वादळी हुंकार गर्जन कर सिंहाची मार प्रहार तुझ्याही रक्तात पडू दे ठिणगी स्वप्नसागर पेटू दे अग्निपंखाणी तुझ्याही कणाकणात ईश्वराचे कण आहे कर्म तुझे भ...

क्षुद्र ब्रह्मांड

क्षुद्र ब्रह्मांड उनाड ह्या दिसात मी सुनाड गीत गायचे मनातल्या डोहात मी मृत सूत पाळायचे जळेल मी उरेल मी रिते ऋतु रुजवायचे डोहात ह्या बुडेल मी मातीतच का मुरायचे चितेवरि जितेन मी जळणार्यांनि मग हरायचे विझुनहि झुरेल मी जिवितांनि मग मरायचे उठेल मी सुटेल मी विजेत्यांनी मग संपायचे पुन्हा पुन्हा पेटेल मी सुस्त सुर्य माळवायचे जखमांचे आभाळ मी अश्रू का ढाळायचे वीज होऊनि मलाच मी अनंत मग जाळायचे अस्त मी परास्त मी युगे युगे जन्मायचे अंत मी अनंत मी विरेल जेव्हा विश्व जिंकुनी नसूनहि असेन मी क्षुद्र ब्रह्मांडाने मोक्षायचे