म्हणजे प्रेम

प्रेमाचा अर्थ जगी कुणाला कळला, ज्याने गमावले तो अखंड जळला

प्रेमासाठी म्हणे हातच्या रेषा लागतात, खर प्रेम काही नसत डोळे तेवढे भिजतात

म्हणे खऱ्या प्रेमाचा नेहमी अंत होतो, आता मला कळले वादळा नंतर सागर का शांत होतो

मिळवले ज्यानी प्रेम ते स्वर्ग सुखात राहिले, हरले जे प्रेमात ते अश्रुत वाहीले

ह्या खेळात प्रेमाच्या लाख स्वप्न मोडली, वोळख स्वतःची हसत हसत सोडली

सांगूनी गेला एक फकीर वेडा, शब्द त्याचे हृदयात ठेवा, प्रेम म्हणजे साधे सरळ विष असते, ज्याच्या हरएक घोटात मृत्युचे बीज असते, खरे सुख प्रेमात वसते, प्रेमात कुणाला मरन नसते, कारण मरना नंतरही जगन्याचे ते गुपित असते..

Comments

Post a Comment

YOUR REVIEW TO THIS POEM

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत