म्हणजे सुख
कधी ऊन कधी पाऊस जीवन असच चालायचं
नुसतच श्वासांवर जीवन किती जगायचं
शर्यतीत जीवनाच्या कुणीच जिंकत नसत
आपण आपल्यला हरवण्याच एवढाच ते बक्षीस असत
घर गाडी बंगला किती क्षुल्लक स्वप्न बघायची
ज्यांच्यासाठी करतो त्यांनाच फारकत द्यायची
मनाचे असे किती खून करायचे,
आसू अन हसुच्या मुखवटयात किती दिस झुरायचे
सुख सुख म्हणता म्हणता किती धावायचे
कधीतरी समजावे मातीतून आलो मातीतच विरायचे
ओठांवरचे हसू म्हणजे सुख नसते
आतून काहीतरी जळत असत ती विझवण्याची सवय असते
अहो कधीतरी सोनेरी पिंजरा आपला तोडावा
मरणाच्या आधी जगण्यात थोडा तरी गोडवा आणावा
-------------स्वारथी
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM