मृत्युंजय


जीवनात  अखंड  संघर्ष  असावा ,
रातीलाही  दिस  बनवेल  असा  काजवा  असावा

हृद्यापारी  एक  अन  एकच  ध्यास  असावा ,
अश्रुनाही  आग  बनवतील  असा  इरादा असावा

धगधगत्या  हृदयाला
अग्निपंख  असावे ,
 पडता  चालता  धडपडता  पाऊल  नेहमी  पुढेच  पडावे

रक्ता रक्तामध्ये  स्वप्न  असे  भिंगावे ,
ज्वलंत श्वासांना  अमर  होण्याचे  अमृत  मिळावे

नभात   उडण्याचे  धाडस  हवे ,
पंखात बळ  तर  आपोआप  येते ,

 तळपतो जो  सूर्यापरी  अथक  ,
सागरापारी  बेभान  वाहतो सतत ,
होतो तयाचा मृत्युंजय जीवनात.
---------------------------------स्वारथी

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत