तूच तुझा किनारा
सर्व काही ठीक असत मग आभाळ अचानक कस कोसळत,
मनही बेधुंद असत मग अचानक ते अश्रूत का भिजत
कुठून आले कुठे गेले सुखाचे क्षण अलगद विरले ,
जरा कुठे मागे वळून पहिले तर डोळे अचानक भरले
कितीतरी काहीतरी जळत असत मनात ,
आपण उगाच मुखवटे घेतो खोटे ह्या जगात
प्रवास काहीतरी मिळवण्यात नाही ,
प्रवासात मिळालेल्या जगण्यात आहे
नभात तुझ्या तूच चंद्र शुक्रतारा ,
वाट शोध तुझी होऊन बेभान वादळवारा
फिरुनी पुन्हा येशील इथेच तूच तुझा किनारा
--------------

Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM