प्रपोज -

तुझी माझी भेट आता सहज होत नाही गेला पाऊस आठवणीचा तरी मन भरत नाही

तस फार काही तू बोलत नाही डोळ्यांनी डोळ्यांना भागता बाकी काही उरत नाही

आठवत का ग तुला विसरलोच होतो जेव्हा मी मला तू मात्र साथ दिली अन प्रवास किती सहज होऊन गेला

प्रेमात जरा मी अडानीच होतो पुस्तकात प्रेमाच्या आता तुझेच धडे गिरवतो

सार काही करुन पाहिल देव मात्र कुठेच नव्हता मला जरा उशीरा कळल पण माझा देव तुझ्यातच होता

7 जन्माच वचन मी देत नाही ह्याच जन्मी तू मोक्ष दिला पुढचा जन्म मिळतच नाही

अजुन खुप काही ये सांगायच पण सारच शब्दात कस मांडायच

साऱ्याच गोष्टींना अंत असतो माझ्या प्रेमात मात्र तेवढाच अपवाद दिसतो

Comments

Post a Comment

YOUR REVIEW TO THIS POEM

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत