निरोप

KP

 निरोप
------------------------------------------------
ठरवून असा कधी निरोप मला देताच येत नाही
प्रयत्न मी  करतो पण अश्रू सोडून  दुसर कुणी साथच देत नाही

निरोपाला  फार  काही तू बोललाच नाही
खोट हसून निरोप देण्याचा खेळ मात्र तुला कधी जमलाच नाही

जाताना एकटेपणाचे ओरखडे जरा  ओढून गेला
नावाला का होईना आठवणींचे औषध मागे ठेऊन गेला

होतो मी कधी कधी थोडा स्वार्थी थोडा दुखी
जीव लागून जातो एजखाद्यावर त्यात मनाची तरी काय चुकी

जगण  हा शिकवून गेला प्रवास तुझा अन माझा
गोड क्षण तेवढे बेरजेत धार बाकी सार कर वजा

आता रस्ते आपले जरा  वेगळे जातील
 क्षणभर विश्रांतीला  पुन्हा मिळतील


थोडा और चलना ये मेरे दोस्त मंझील अपनी करीब है
तुझ्या ह्या मित्राकडे फक्त दुआ आहे बाकी तर मी  गरीब आहे

तुला हव ते सर तुझ्या मनासारखं होऊ दे
तुला मिळालेल्या सुखदुखात माझा खारीचा वाट राहू दे


                                                                                                                स्वारथी

Comments

Post a Comment

YOUR REVIEW TO THIS POEM

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत