मृगजळच असतात काहि लोक

लांबुन किती गोड भासतात
जवळ आल्यावर टोचतात
सुरुवातीला भरभरून गप्पा मारतील
नात जुन झाल्यावर गृहितच धरतील
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

नेहमी कोण म्हणत बोलाच अस
पण आठवण येतच नाहि तर होणार कस
तुम्हि काय बाबा बीजी लोक
अस म्हणून आपणच खाजवायच डोक
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

निबंधच लिहा माझ्यावर अस कोण म्हणत
आठवण जुनी शेअर करा ब्रॉडकास्ट नसु द्या फक्त
कॉपि पेस्ट सुविचारांचे डोस यांचे सकाळ संध्याकाळ
एवढ्याना कसा वेळ देणार म्हणुन फॉर्वर्ड चा बाजार
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

दिवसा नाहितर रात्री हे वॉट्सअप वर राहणारच
आपण आपल दोन शब्द पाठवले तर एक स्माईलि पाठवुन सरळ झोपणारच
तुला कॉल केला होता म्ह्णून मोकळ होणारच
कोण किती कॉल केले याचे हिशोब बरोबर ठेवता
फॉर्वर्ड चे मेसेज सोडले तर बाकि काय पाठवता
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

कुणाच्या तरी लग्नात पार्टीत यांचेच वरुन टोमणे बसतील
आम्हाला भेटत नाहि कॉल करत नाहि म्ह्नुन दात ओठ खातील
दररोज बोलल तरच प्रेम दिसत काय
खुप दिवसांनी खरच आठवण आल्यावर बोलल तर प्रेम आटत काय
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

तुमच्यासाठि काय पण म्हणनारे आता काहिच म्हणत नाहि
किती पांचट अन बालिश होतो अस म्ह्णून वेगळेच होतात काहि
आधिच खौट वरुन पाऊट करुन डिपी बदलले
जॉब लागला यांना अन यांनी तर सोनेच गिळले
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

हो पण असतात काहि नमुने जुन्या दिसात रमणारे
आपण बोलोलो न बोलोलो तरी पण हक्काने सतावणारे
पर्वा नसते त्यांना कमीपणाचि
त्यांच्यासाठि तुम्ही क्रिष्ण अन सुदाम्याची प्रीती त्यांची
मृगजळच असतात काहि लोक
बंदच पडुन जात डोक

ब्रॉडकास्टच्या गर्दित नाव ॲड केल म्ह्णून प्रेम ॲड होत नाहि
कधीतरीच पण कळकळिने फोन केला तर खरेपणाहि दिसतो काहि
जुनी हाक जुने नाव किती किती रोमांच देऊन जातात
नव्याच्या भाऊगर्दित जुनी गाव काहि तशीच राहतात
वेळ बदलली स्टेटस बदलल जुन्यातुन नव्या घरी
गरज आहे मनापासुन आलेल्या आठवणिची कधीहि अन कुठेही
कारण असतात काहि खुळे सांगायला तिच मैत्री तेच किस्से तिच दुनियादारी आजहि अन उद्याही

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत