एकटा
म्हणायला तर लाख तार्यांचा परिवार मोठा
किती डाग बेईमानीचे गिळुन उभा तो चंद्र होता
सोबत अन साथ यातला फरक त्यालाच तर ठाऊक होता
सोबतीला त्याच्या भलेहि लाख चांदण्या पण साथिला फक्त डाग होता
चंद्राचा घात करुन चांदनीला तुटण्याचा बहाणा खोटा
तरिच म्हंटल एकाहि चांदणीला तो बिलगत का नव्हता
गर्दित चांदण्यांच्या चंद्र तो एकटा होता
झाडाला एकट पाडण्यात पानांचाच तर हात होता
बहरलेल्या वसंतातले वायदे पानगळीतल्या हेमंतात तोडण्याचा सौदा होता
एकटेपणात चंद्र अन झाड लाचार कुठे होते
गर्दितले तुटकेपण त्यांनी धिक्कारले होते
म्हणून तर एकटेपण त्यांनी स्विकारले होते
एकटेपणात दुख त्यांनी पाहिले नव्हते
पान अन चांदण्याच्या गर्दित ते हरवले होते
श्राप नव्हता एकटेपणाचा
कटु सत्याचा प्रवास होता
एकटा जन्म एकटा मृत्यू
अन मध्ये अस्तित्वाचा खेळ होता
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM