हट्ट तिचे
मी लाख वेलींनी नाते ते जोडायचे
तिचे हट्ट होते सारे काहि तोडायचे
कधीचेच पानांना होते गळायचे
मला मात्र चाफ्याला होते फुलवायचे
तुटणाऱ्या ताऱ्याकडे तिलाच मी मागायचे
तुटलेल्या ताऱ्यात तिला फक्त योगायोग दिसायचे
कधीचेच चंद्राला होते ग्रहणायचे
मला मात्र पौर्णिमेच चित्र होते रंगवायचे
सागरात माझ्या रोज तिने वादळायचे
टिचलेल्या होडिला मीच मग ठिगळायचे
कधीचेच लाटेला किनाऱ्यातुन होते सुटायचे
मला मात्र भरतीचे उत्सव होते करायचे
साता जन्माचे फुटकळ वायदे तिने बोलायचे
ह्या जन्माच विचारल्यावर कोड्यात तिने पडायचे
मुर्ख होते कुंडलीकर्ते भविष्य खोटेच ठरायचे
मला मात्र सोबतीचे स्वप्न खरे होते करायचे
किती कवितांनी माझ्या आता खोटे ठरायचे
ओळी ओळी विस्कटतांना मुके मुके हुंदकायचे
कधीचचे वहिला माझ्या होते उसवायचे
मला मात्र लेखनी होऊन तुलाच पुन्हा गिरवायचे
जा तुझ्या तु रस्त्याने पुन्हा नको नाटक सहप्रवासाचे
तुला सोबत म्हणुन किती गावं सोडले मी आपुलकीचे
तुझ्या एका गजऱ्यासाठि किती बकुळिंनी वाळायचे
मी मात्र एक एक आठवणीला अलगद अलवार ओवायचे
ईरादा तुझा पक्का होता मलाच बाकि होते सांगायचे
साथ तुझी मागितल्यावर तु मात्र मुके राहायचे
कधीचे कट बेईमानिचेे होते तुला रचायचे
मी केली असती सुटका तु फक्त विचारायला हवे होते
शपथा घालुन फारकतिच्या तुच तु छळायचे
वादे सोबतीचे आठवता मीच मी जळायचे
खोट्या नाट्या भातुकलीचे खेळ किती खेळायचे
श्वास तु घेतल्यावर मी निश्वास किती पळायचे
पाण्यात पाणी पडल्यावर वेगळे कसे ग करायचे
सोबतीचे क्षण अर्धे तुझे अर्धे माझे कसे ग वाटायचे
सुतकाच्या ह्या दिसात उत्सवाचे मंडप तु थाटायचे
मला मात्र नदि होऊन सागराला तुझ्या गाठायचे
आर्जव माझे कळकळिचे तु का म्हणुन ऐकायचे
कर्तव्याने तु बांधलेली तरी तुझ्यातच मी अडकायचे
विष आहे दुराव्याच तरी तु दिल ये म्हणून प्यायचे
तुझच सारे खरे अन खोटे खोटे मी हसायचे
इथुन पुढे तु असुनही आता नसायचे
साथ इथवरच होती तुझी मी माघारी वळायचे
मागे तु पाहु नकोस नजारे हे भिषणतेचे
तिळ तिळ तुटणारे नाते तुझे नी माझे
हट्टच केले तु दुराव्याचे
अन मी खुशाल ते पुरवायचे
एकटे तु एकटे मी चालायचे
सावलीचेहि ओझे आता न झेपायचे
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM