धुराडे कुजकट समिधेचे
आता शेवटचा हा क्रम नीट बघत रहा तु...
पहिले हि लढाई आतंकवाद विरूध्द भारत असेल..
मग हि लढाई भारत विरूध्द काश्मिर होईल..
मग काश्मिरी विरूध्द हिंदु होईल...
मग हिंदु विरूध्द मुस्लिम होईल...
मग खरे देशभक्त विरूध्द कथित देशभक्त होईल...
मग हि लढाई मनुवादि हिंदु विरूध्द हिंदु होईल...
मग उच्चवर्णीय हिंदु विरूध्द ईतर होईल...
मग स्त्री विरूध्द पुरुष होईल...
मग दक्षिण विरूध्द उत्तर विरूध्द पश्चिम विरूध्द पूर्व...
मग उरलेले पावण हिंदु वामनी पाऊल टाकुन ,
करुन घेतील त्यांच्या नावावर हि ओसाड स्मशान झालेली रक्ताटलेली जमीन अन तडकच आखले जातील यज्ञकुंड प्रसन्न करायला आकाशात बसलेल्या यांच्या कल्पनेला अन अज्ञानाला...
विव्हळतील मंत्र स्वतःच्याच खुमखुमीला शांत करण्यासाठि...
घेतील कवट्या ह्या साऱ्या विरूध्द शब्दांच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या साऱ्यांच्या अन भस्म करतील मानव म्हणुन उरलेल्या साऱ्या संवेदणा..
शेवटी एक शेवटची दंगल घडेल उरलेल्या पवित्र पावन टाळक्यांमध्ये..
कारण उरलेल्या प्रत्येकच
रक्तपिपासुला भुक कडाडुन लागेल धर्म नावाचा अग्निकुंड तेवत ठेवायची...
सरतेशेवटि उरेल फक्त अफाट तडतडणारी धग...
जीचे धुराडे लोणच्या लोण होऊन भारत भर पांगत जातील..
मग उरेल फक्त विखारी कल्पनांनी अन् चकोरी अपेक्षांनी भरलेल धुर्त आभाळ...
खाली उरेल फक्त भारताच्या वैभवशाली पिढ्या यथेच्छ ढोसुन खै खै हसणारी जमीन...
अन् मध्ये उरतील धुराडे फक्त धर्म जात लिंग रंगांच्या कुजकट समिधेचे...
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM