जुने नवे संकल्प
म्हंटल गेल्या वर्षाचा हिशोब करु
वजा झालेले क्षण आता बेरजेत धरु
सुरुवात अशी कुठुन करावी
सुखाने दुखाला भागता आठवण बाकि उरावी
नविन नविन तरी काय असत
जुन्यावर नव्याचा मुखवटा फक्त
जखमा किती दुखाच्या काळाने भरत गेल्या
सरि सुखाच्या किती भरुन वाहिल्या
जुन्यात राहायचा स्वार्थ सोडवत नाहि
नव्या मागे धावता धावता मागे काहि उरत नाहि
का उगा संकल्पाचा हट्ट धरावा
स्वप्न तिच रंग मात्र नवा द्यावा
फुल हि तेच अंकुर मात्र नवा फुटावा
ध्यास जुनाच पन आस मात्र नविन असावी
उगा खोटि संकल्प का सोडावी
जुन्या स्वप्नांसाठि तुला नविन शुभेच्छा
तुझ्या नव्यात माझी जुनी साथ राहु दे एवढी सदिच्छा
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM