शिंतोडे


विकासाच्या हत्याकांडात माणुसकिचे मुडदे
बळी घेऊनच्या घेऊन मगर तिचे अश्रू काढे
धर्माच गिधाड आता विकास पंखांनी उडे
बघ्यांची गर्दि थोडी मागे थोडि पुढे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

हाजीहाजि करणारे चमचे
दिवसागणिक वाढे यांचे
किती गांधी किती पानसरे
आवाज उठवणारे ठार झाले
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

कधी धर्मसत्ता कधी राजसत्ता
कातिल तेच इकडचे आता तिकडे
हुकुम देणारे आका तेच
बळी इथेहि माणुसकिचे पडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

दावे खोटे स्वप्न खोटे
जनता कालहि बुडाली आजहि बुडे
सापाने फक्त कात टाकली
विष अजूनही तेच जालिम सोडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

किती दंगली किती संहार त्यांच्या नावावर होते
कालची पाप आज धुतायेे सत्तेतली दगडगोटे
बाहुले हे कट्टरवाद्यांचे खोटे
जनतेला दिसे विकासाचे मुखवटे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

सीमेवर दररोज एक वीर धारातिर्थि पडे
पोकळ आश्वासनांची नुसती धुळ उडे
कधी धर्म कधी विकासाचे जनतेला पेढे
पेढ्यांमधली भांग ढोसुन जनताही मग सुस्त पडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

गरीबांचे नाव घेउन एक प्यादा किति बडबडे
विकासाचे बळी जाताये फरक त्याला न पडे
तो वक्ता हुशार शब्दांचे फक्त फुगे सोडे
जनतेलाही आता तेच आवडे
जिकड वार जातय तिकडच उडे
आपल कुणी मरत नाहि म्हणुन फरक न पडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

घोषणा जितक्या भंपक तितक्या टाळ्या त्यांना पडे
अंगभर त्यांच्या खुनांचे शिंतोडे
त्यावरच चढवले त्याने आता फकिराचे कपडे
येताजाता मगर तिचे अश्रू काढे
भांग भावनेची पाजल्यावर जनताहि ढसाढसा रडे
दाखवलेले दिवस स्वप्नातले कधी न उजडे
कोण सांगणार जनतेला सारेच इथे भक्त भाबडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

घडल्या असतील आधी लाख क्रांत्या भुमिवर ह्या
आज नाहि घडणार क्रांती कुठल्या
तेवढि ताकद आज बाहुत नाहि इथल्या
पिढ्या आजच्या व्यक्तिपुजेत बुडाल्या
बुडता बुडता घोषणांचे निघे बुडबुडे
उडताये खुनाचे दररोज शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

येतच राहतील नविन घोषणा
हुरळुन जाईल जनता पुन्हा
पुसल्या जाताये वास्तवाच्या खुणा
व्यक्तिंपुजेत लागलाय देश पुन्हा
सांगतील ती देशभक्ती तुम्हि माना
वास्तव सत्य बोलणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा
फरक कुणाला पडतोय नुसत्याच हलवा माना
अहो तुटलाय तर तुटु द्याना कणा

व्यक्तिंमागे चालत रहा पाडुन लोकशाहिचे मुडदे
इथेहि हिटलर आकार घेतोय चालत रहा मुके
वास्तवाची जाणीव असणारे जिवंत असतील थोडे
गुंगीत बाकिचे असतांना ते मात्र स्वप्नात न पडे
तेच असतील साक्षीदार हत्याकांडचे इथुन पुढे
उडतील खुनाचे अजूनही शिंतोडे
तुझ्यावर थोडे माझ्यावर थोडे

*किरण*
अजुन कविता वाचण्याकरिता भेट द्या:
*ahammarathi.blogspot.in*

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत