गुणिले नविन वर्ष
नेहमीच्या रस्त्याला जरा चुकवावे
वाटा अनवट तुडवत अनवाणी चालावे
फकिरे जिद्दि कधीतरी बनुन बघावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
मला माझ्या मी मध्ये किती गुंतवावे
आपण आपल्या सर्वांमध्ये आता मिसळावे
दोन पाऊले ते चालतील दोन आपण चालावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
तेच नियम पोकळ आदर्श किती घोकावे
प्रश्न करुन स्वतःला 'स्व' तुन सोडवावे
सोयिच्या जगण्याला थोडे सुईने टोचावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
पुरे झाले जप जाप आता निसर्गाला पुजावे
होम हवन सोडून कधितरी झाडास बिलगावे
मातीचेच तत्व आपण मातीतच मुरावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
मागचा पाऊस सुटला निदान यंदा तरि भिजावे
मागचा वसंत निसटला निदान यंदा तरी बहरावे
लोक बोलतील म्ह्णून आपण का गप रहावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
पिढ्यानपिढ्या गेल्या उदो उदो किती करावे
हा झेंडा तो झेंडा करत खांदे किती झिजवावे
सरडेच अहो ते रंग त्यांनी बदलावे
संधीसाधुच नेते आपण का भक्त व्हावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
जे आपण नाहिच मुळात ते का बनावे
संकल्पाचे खोटे मुखवटे किती लावावे
असु वेडे आपण जरा पण प्रवाहात का वाहावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
डोक्याच ऐकून यंदाहि चौकटीत का अडकावे
खुळ असल म्हणून काय झाल मनाचेहि ऐकावे
होऊन होऊन काय होईल कटु अनुभव घ्यावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
सगळे तिकडे जाताय म्हणून तिकडेच का जावे
झाले ते समाधानी पण आपण का थांबावे
नसेल गेल त्या वाटेवर कुणी तर आपण चालावे
काटे जरा टोचतील पण नजारे नवे पहावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
तोडकमोडक का असेना पण शब्द आता रचावे
जिव हा संपुन जाईल निदान कवितेने आपल्या अमर व्हावे
कवितेचे मग आपल्या गाणे गावे
गाता गाता मैफिलीत दर्दि रंग भरावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
ते म्हणे फुंकुनी ताक प्यावे
हे जग नाहि सरळ तुम्ही वाकडे व्हावे
सांगा त्यांना पडत धडपडत का होईना पण चालावे
उद्याचा विचार करून आज का मरावे
आकाशही मिळेल पण आधी घरट्यातुन तर बाहेर यावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे
सोडणाऱ्याला सोडावे
जोडणाऱ्याला जोडावे
प्याला जुना का असेना त्यास नव्याने भरावे
भरता भरता आपण मात्र रिक्त व्हावे
रिक्त कोषात त्या नवे धागे गुंफावे
गुंफता गुंफता पुन्हा नव्याने जन्मावे
वर्ष येतील अन जातील आपण का हिशोब ठेवावे
आपण मात्र मस्त मौला फकिर मुक्त जगावे
नविन वर्षाला यंदा नव्याने गुणावे... नव्याने गुणावे...
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM