Posts

Showing posts from January, 2016

मृत्युंजय

जीवनात  अखंड  संघर्ष  असावा , रातीलाही  दिस  बनवेल  असा  काजवा  असावा हृद्यापारी  एक  अन  एकच  ध्यास  असावा , अश्रुनाही  आग  बनवतील  असा  इरादा असावा धगधगत्या  हृदयाला अग्निपंख  असावे ,  पडता  चालता  धडपडता  पाऊल  नेहमी  पुढेच  पडावे रक्ता रक्तामध्ये  स्वप्न  असे  भिंगावे , ज्वलंत श्वासांना  अमर  होण्याचे  अमृत  मिळावे नभात   उडण्याचे  धाडस  हवे , पंखात बळ  तर  आपोआप  येते ,  तळपतो जो  सूर्यापरी  अथक  , सागरापारी  बेभान  वाहतो सतत , होतो तयाचा मृत्युंजय जीवनात. ---------------------------------स्वारथी

म्हणजे सुख

कधी  ऊन कधी पाऊस जीवन असच चालायचं नुसतच श्वासांवर जीवन किती जगायचं शर्यतीत जीवनाच्या कुणीच जिंकत नसत आपण आपल्यला हरवण्याच एवढाच ते बक्षीस असत घर गाडी बंगला किती क्षुल्लक स्वप्न बघायची ज्यांच्यासाठी करतो त्यांनाच फारकत द्यायची मनाचे असे किती खून करायचे, आसू अन हसुच्या मुखवटयात किती दिस झुरायचे सुख सुख म्हणता म्हणता किती धावायचे कधीतरी समजावे मातीतून आलो मातीतच विरायचे ओठांवरचे हसू म्हणजे सुख नसते आतून काहीतरी जळत असत ती विझवण्याची सवय असते अहो कधीतरी सोनेरी पिंजरा आपला तोडावा मरणाच्या आधी जगण्यात थोडा तरी गोडवा आणावा -------------स्वारथी

तूच तुझा किनारा

सर्व  काही  ठीक  असत  मग  आभाळ  अचानक  कस  कोसळत, मनही  बेधुंद  असत  मग  अचानक  ते  अश्रूत  का  भिजत कुठून  आले  कुठे  गेले  सुखाचे  क्षण  अलगद विरले , जरा  कुठे  मागे  वळून  पहिले  तर  डोळे  अचानक भरले कितीतरी  काहीतरी  जळत  असत  मनात , आपण उगाच  मुखवटे  घेतो खोटे  ह्या  जगात प्रवास  काहीतरी  मिळवण्यात  नाही , प्रवासात  मिळालेल्या  जगण्यात  आहे नभात  तुझ्या  तूच  चंद्र  शुक्रतारा , वाट  शोध  तुझी  होऊन बेभान  वादळवारा  फिरुनी  पुन्हा  येशील  इथेच  तूच  तुझा  किनारा --------------

सांग तिला

सांग तिला तिच्यावीना जगणे कधी जमलेच, तिच्यावीना हे हृदय कधी धडकलच नाही.. मी खरच का इतका वेडा होतो तिच्यासाठी, खर सांगायच तर हा तारा तुटतो फक्त तिच्यासाठी.. ठरवून तिच्याशी कधी बोलता आलेच नाही, ती समोर आल्यावर जीवात जीव राहिलाच  नाही.. सांग तिला शेवटचा निरोप, ती जिथे असेल तिथे सदैव खुश रहावे, उगाच तीने मागे का पहावे.. एक तारा एकटाच तुटला, काट्याचा त्या गुलाबात जीव रुतला.. हाक एकदा देऊन बघ राखेतून जीव पुन्हा उठला... -------------स्वारथी

प्रपोज -

तुझी माझी भेट आता सहज होत नाही गेला पाऊस आठवणीचा तरी मन भरत नाही तस फार काही तू बोलत नाही डोळ्यांनी डोळ्यांना भागता बाकी काही उरत नाही आठवत का ग तुला विसरलोच होतो जेव्हा मी मला तू मात्र साथ दिली अन प्रवास किती सहज होऊन गेला प्रेमात जरा मी अडानीच होतो पुस्तकात प्रेमाच्या आता तुझेच धडे गिरवतो सार काही करुन पाहिल देव मात्र कुठेच नव्हता मला जरा उशीरा कळल पण माझा देव तुझ्यातच होता 7 जन्माच वचन मी देत नाही ह्याच जन्मी तू मोक्ष दिला पुढचा जन्म मिळतच नाही अजुन खुप काही ये सांगायच पण सारच शब्दात कस मांडायच साऱ्याच गोष्टींना अंत असतो माझ्या प्रेमात मात्र तेवढाच अपवाद दिसतो

अखेरचा निरोप

तुला शेवटच भेटाव म्हणून मी लाखाचा नवस केला,  विसरलोच होतो मी तू माझ्यातच होती अन मी ऊगाच प्रवास केला, तू नदी मंजुळ मी टाकाऊ दगड,  याही जन्मी आपली भेट वाटे मला अवघड,  आलो पुढच्या जन्मात तर तोही तुझ्यावरच अर्पण,  तू राहा सुखी सदा तुजसोबत सावली मी दर्पण,  फाटलेल का असेना तुझ्या वहीत असू दे माझाही एक पान, माझ सुखायुष्य तुला लाभू दे एवढाच माझ फाटक दान ---------------------स्वारथी

म्हणजे प्रेम

प्रेमाचा अर्थ जगी कुणाला कळला, ज्याने गमावले तो अखंड जळला प्रेमासाठी म्हणे हातच्या रेषा लागतात, खर प्रेम काही नसत डोळे तेवढे भिजतात म्हणे खऱ्या प्रेमाचा नेहमी अंत होतो, आता मला कळले वादळा नंतर सागर का शांत होतो मिळवले ज्यानी प्रेम ते स्वर्ग सुखात राहिले, हरले जे प्रेमात ते अश्रुत वाहीले ह्या खेळात प्रेमाच्या लाख स्वप्न मोडली, वोळख स्वतःची हसत हसत सोडली सांगूनी गेला एक फकीर वेडा, शब्द त्याचे हृदयात ठेवा, प्रेम म्हणजे साधे सरळ विष असते, ज्याच्या हरएक घोटात मृत्युचे बीज असते, खरे सुख प्रेमात वसते, प्रेमात कुणाला मरन नसते, कारण मरना नंतरही जगन्याचे ते गुपित असते..

निरोप

KP  निरोप ------------------------------------------------ ठरवून असा कधी निरोप मला देताच येत नाही प्रयत्न मी  करतो पण अश्रू सोडून  दुसर कुणी साथच देत नाही निरोपाला  फार  काही तू बोललाच नाही खोट हसून निरोप देण्याचा खेळ मात्र तुला कधी जमलाच नाही जाताना एकटेपणाचे ओरखडे जरा  ओढून गेला नावाला का होईना आठवणींचे औषध मागे ठेऊन गेला होतो मी कधी कधी थोडा स्वार्थी थोडा दुखी जीव लागून जातो एजखाद्यावर त्यात मनाची तरी काय चुकी जगण  हा शिकवून गेला प्रवास तुझा अन माझा गोड क्षण तेवढे बेरजेत धार बाकी सार कर वजा आता रस्ते आपले जरा  वेगळे जातील  क्षणभर विश्रांतीला  पुन्हा मिळतील थोडा और चलना ये मेरे दोस्त मंझील अपनी करीब है तुझ्या ह्या मित्राकडे फक्त दुआ आहे बाकी तर मी  गरीब आहे तुला हव ते सर तुझ्या मनासारखं होऊ दे तुला मिळालेल्या सुखदुखात माझा खारीचा वाट राहू दे                                ...