विषाणू

हवा हिंडाळत फिरते घरादारांच्या चेहऱ्यावरुन
उपसुन नेते गाडल्या गेलेल्या प्रश्नांना डोळ्यांतुन

वस्त्या रस्त्यांवर शिंपडले गेलेले देहांचे सडे
आरसे होऊन चमकवतात समानतेचे शिंतोडे

एकच भाषा कळते आता माणसांच्या कळपांना 
भीतीचे सोहळे पोटाच्या तव्यावर भुक म्हणुन नाचवतांना

अंतर ठेऊन बसलेले माणुस नावाचे कोळि
विणताय आता तात्पुरत्या सहजीवनांची जाळी

पण अजुनहि ठणठणीत निजल्यात जातींच्या बुरश्या
ऋतु हा संपल्यावर पुन्हा घोकतील झेंड्यांच्या भाषा

एक विषाणु घुसळुन टाकतो साचलेल्या हव्यासाला
खिडक्यांच्या तुरुंगातले कैदि तडफडतात स्पर्शाला

बोथटलेल्या अस्तित्वाला नवी धार पाजळतील काय
ईथले थडगे नव्या श्वासांचे गीतसार गाजवतील काय

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत