मार्क्स बाबा - Karl Marx
"धर्म हि अफुची गोळि आहे" हे जगप्रसिद्ध वाक्य जेव्हा ऐकल तेव्हा तुझ्याकडे अक्षरश: ओढला गेलो होतो.
कॉ.भगतसिंगची नास्तिकता माझ्यात रुजवायला जे खतपाणी होत ते तुझ्याकडुन तर झिरपल होत.जगात सर्वात टोकाच प्रेम आणि तितकाच द्वेष मिळवणारा विचारवंत शेकडो वर्षांनंतर देखील तितकाच किंबहुना टिचभर जास्तच संलग्न वाटतो.तुला भेटण्याचा प्रवास जरा उलट झाला.कॉम्रेड भगतसिंगचा अभ्यास करतांना त्याचा आदर्श लेनिन भेटला लेनिनच्या अभ्यासात त्याचा गुरु म्हणुन तु भेटलास.मग नंतर चे गव्हेरा,हो चि मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो,डॉ.आंबेडकर ते अण्णाभाऊ साठे,अमर शेख,कॉ. डांगे,नारायण सुर्वे,कुरुंदकर,सुरेश भट, ढसाळ,राज कपुर,बलराज साहनी आणि अशी कितीतरी मोठि लिस्ट देता येईल ज्यांनी प्रेरणा घेतली किंवा अभ्यास केला तुझ्या क्रांतिकारी विचारांचा.
'एंगेल्स' सारखा परममित्र हिमालयाची सावली होऊन मरेपर्यंत सोबत राहिला.'जेनी'सारखी जोडीदार आयुष्यातल्या भल्या मोठ्या वादळवाऱ्यात खंबीरपणे सोबत राहिली. उच्च कोटिचे दारिद्र्य,महाभयंकर व्याधी आणि एकावर एक पुत्रशोक तरी तुझा मुक्काम आयुष्यभर वाचनालयात आणि आंदोलनात. शोषितांच्या आर्थिक स्वातंत्र्यसाठि क्रांती घडवणारा स्वतः मात्र पै पै साठि तळमळत राहिला. तु गेल्यावर मात्र जगाने आजतागायत तुला डोक्यावर घेतलय. काय ती दर्जेदार शोकांतिका. अर्थातच बाकि महापुरुषांविषयी जे होत ते तुझ्याहि बाबतीत घडल. तुझ्याच काहि अनुयायांनी तुझ्या विचाराना सुरुंग लावुन जगभर तुला बदनाम केल. पण संपेल तो "मार्क्स" कसला.
बुद्धईजम, गांधीईजम, जैनईजम,सोशलिजम सारख्या 'ईजम्स' मध्ये तुझा स्वतःचा मार्क्सईजम जगातल्या सर्वच देशातल्या राजकीय उलथापालथीमध्ये तुझा उल्लेख होत नाहि अशी एकहि आंतरराष्ट्रीय घटना नाहि.
ईतका प्रचंड भरीव प्रभाव गेल्या शेकडो वर्षांत फार कमी व्यक्ती पाडु शकलेत. ईतका कि बुद्ध सॉक्रेटिस,प्लॅटो च्या पंक्तीत तु जाऊन बसलास. कारण कदाचित तु म्हणतो तसं "आज पर्यंत विचारवंतांनी जगाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला आहे, मुद्दा आहे जग बदलण्याचा!!" आणि तु बदललं देखील.

Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM