प्रेमाचे मलंग रस्ते
"तुला आठवतय का रे? मी तुला विचारलं होत, हे रस्ते कुठे संपतात?" एसटि बसच्या खडखडणाऱ्या खिडकिच्या सुरात सुर मिसळत धावणाऱ्या रस्त्यावर नजर स्थिर करत तिने त्याला विचारलं. "हुम...
अहम म्हणजे स्वार्थ हा एकांगी विचार सोडुन त्याचा अर्थ स्वत:च्या अस्तित्वात आणि जन्म ते मृत्युपर्यंतच्या प्रवासात शोधन हादेखील असु शकतो.जगाकडे बघता बघता आपल्यामध्येहि एक स्वतःच जग तयार होत असत. त्यात आपुलकीच्या माणसांची घर,स्वप्नांचे आकाश,दररोज येणारे गोड आणि कटु अनुभव,घुसमट,भावनांचा उद्रेक अशा असंख्य गोष्टींनी आपल जग आपण बनवत असतो.ह्याच आपल्यातल्या अहम च्या जगाला कवितांच्या स्वरूपात मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्हीदेखील शोधुन बघा तुमच्यातल्या अहममध्ये मध्ये तुम्ही तयार करत असलेले जग.