शाळा माझी विठूमाऊली

शाळा माझी विठूमाऊली

आई तुला काहि सांगायचे आहे

भट्टित भाजलेला हात तुला दाखवायचा आहे
 
शाळेचा शेवटचा दिवस आजही आठवतो ग मला

मास्तरांनी दिलेली कोरि पाटि अन सुविचारांनि भरलेला गच्च फळा 

भट्टिवरच्या ढिगावरुन आज प्रार्थना ऐकु आली

स्वप्नांच्या विटेवरची माझी शाळा मात्र अपुरीच राहिली

शाळेच्या मैदानात आज जरा जास्तच धूळ उडाली

डोक्यावरची पाटि पाहुन मित्र माझिए हसुन गेली 

त्यांच्या हसण्याची आता मला सवय झाली

भट्टीच्या विटांनी मात्र तेवढि दोस्ती निभावलि 

पोटभर खेळून मधल्या सुट्टीची बेल झाली

अर्धवट डबे सोडून मित्रांनी गोळेवाल्याकडे गर्दी केली

आई तु दिलेली कांदा न भाकर मात्र पोट भरवून गेली 

भट्टिच्या पोरांसाठि शाळा उघडनार अशी बातमी आली
डोक्यावरच ओझ जरा हल्क करुन गेली

विटांच्या जागी पाटि येणार म्ह्णून विट जरा रुसली

चेहऱ्यावरच माझ हसु पाहून मग तीही लालबुंद हसली 

आई आता मी पन मोठा माणूस होणार

ह्याच भट्टिच्या विटांनी आपला बंगला बांधणार

आई आता संपेल कष्टांचे ऊन 

सुरु होइल सुखांची सावली विटांवरि

उभी शाळाच माझी विठू माऊली....

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत