Posts

Showing posts from November, 2018

शिवराय गीत

Image
ऋणात जयाच्या पिढ्या समस्त वजा गेले l कीर्ती तयाच्या सुर्य होऊनी तेजात वाहिलें ll सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव जाणता राजा शिवाजी शोभलें ॥ तेजनेत्र तिखे दुरद...

मातीतली हिमालय

Image
हि कविता अर्धवट सोडुन दिली होती.मागे किसान मोर्चात आपला बळिराजा तुफानी चाल करत मुंबईत दाखल झाला होता भल्या रात्री.त्यावेळेस कोणत्याही माणुस म्हणुन जिवंत असणाऱ्याच्या जाणीवेची हजारदा कत्तल व्हावी अशी दशा त्या मोर्चेकरी शेतकऱ्यांची झाली होती. चाबुकासारखे रट्टे मेंदुवर पडुन झिनझिन्या आल्यावर कविता लिहिता लिहिता तशीच अपुर्ण राहिली होती.              मागे पुन्हा दिल्लीच्या बादशहाने चिरडण्याचा प्रयत्न केला,दिल्लीत येणाऱ्या बळिराजाच्या पदयात्रेला. आज पुन्हा येताय मातीतली हिमालय विधानभवनाच्या भिंतीजवळ. येतच राहतील पुन्हा पुन्हा मुर्दाड सरकारांना भुकंपवण्यासाठि. त्याच हिमालयांना समर्पित हि कविता. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तु रात्रीतल ऊन अनुभवल ये का कधी? होरपळणार..लालजर्रत.. हसु नको आता लगेच माझ्यावर.. रात्रीत कसं ऊन असेल? जरा निट बघ तुझ्या जेवणाच्या ताटाकडे.. चपातीतल्या असंख्य सनसनित सुर्यांनी तुझ्या डोळ्यांना अंधारी आली ना? पुन्हा हसतोयस माझ्यावर... अरे हो विसरलोच मी... तुझ्या मेंदुला आता जळमट लागलय विसरण्याच... बरच काहि विसरण्याच.....

पुतळे

Image
पुतळेच चालवतात हा देश. पुतळेच थांबवतात हा देश.. पुतळे आजहि बोलतात.. कुणाच्या तरी विरूध्द विष पेरायला... पुतळे उंच उंच पोहचतात.. कुणाची तरी उंची कमी दाखवायला.. पुतळे सारेच असता...