Posts

Showing posts from 2020

विषाणू

हवा हिंडाळत फिरते घरादारांच्या चेहऱ्यावरुन उपसुन नेते गाडल्या गेलेल्या प्रश्नांना डोळ्यांतुन वस्त्या रस्त्यांवर शिंपडले गेलेले देहांचे सडे आरसे होऊन चमकवतात समानतेचे शिंतोडे एकच भाषा कळते आता माणसांच्या कळपांना  भीतीचे सोहळे पोटाच्या तव्यावर भुक म्हणुन नाचवतांना अंतर ठेऊन बसलेले माणुस नावाचे कोळि विणताय आता तात्पुरत्या सहजीवनांची जाळी पण अजुनहि ठणठणीत निजल्यात जातींच्या बुरश्या ऋतु हा संपल्यावर पुन्हा घोकतील झेंड्यांच्या भाषा एक विषाणु घुसळुन टाकतो साचलेल्या हव्यासाला खिडक्यांच्या तुरुंगातले कैदि तडफडतात स्पर्शाला बोथटलेल्या अस्तित्वाला नवी धार पाजळतील काय ईथले थडगे नव्या श्वासांचे गीतसार गाजवतील काय

मार्क्स बाबा - Karl Marx

"धर्म हि अफुची गोळि आहे" हे जगप्रसिद्ध वाक्य जेव्हा ऐकल तेव्हा तुझ्याकडे अक्षरश: ओढला गेलो होतो. कॉ.भगतसिंगची नास्तिकता माझ्यात रुजवायला जे खतपाणी होत ते तुझ्याकडुन तर झिरपल होत.जगात सर्वात टोकाच प्रेम आणि तितकाच द्वेष मिळवणारा विचारवंत शेकडो वर्षांनंतर देखील तितकाच किंबहुना टिचभर जास्तच संलग्न वाटतो.तुला भेटण्याचा प्रवास जरा उलट झाला.कॉम्रेड भगतसिंगचा अभ्यास करतांना त्याचा आदर्श लेनिन भेटला लेनिनच्या अभ्यासात त्याचा गुरु म्हणुन तु भेटलास.मग नंतर चे गव्हेरा,हो चि मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो,डॉ.आंबेडकर ते अण्णाभाऊ साठे,अमर शेख,कॉ. डांगे,नारायण सुर्वे,कुरुंदकर,सुरेश भट, ढसाळ,राज कपुर,बलराज साहनी आणि अशी कितीतरी मोठि लिस्ट देता येईल ज्यांनी प्रेरणा घेतली किंवा अभ्यास केला तुझ्या क्रांतिकारी विचारांचा. 'एंगेल्स' सारखा परममित्र हिमालयाची सावली होऊन मरेपर्यंत सोबत राहिला.'जेनी'सारखी जोडीदार आयुष्यातल्या भल्या मोठ्या वादळवाऱ्यात खंबीरपणे सोबत राहिली. उच्च कोटिचे दारिद्र्य,महाभयंकर व्याधी आणि एकावर एक पुत्रशोक तरी तुझा मुक्काम आयुष्यभर वाचनालयात आणि आंदोलनात. शोषितांच्या ...