फक्त बरस अन वाहुन जा
तो येतोय.. वाईट काळात दगाबाज ठरलेल्या नात्यांना मुळासकट वाहुन न्यायला.. तो येतोय विश्वासघाताच्या उन्हाने जळुन राख बेचिराख झालेल्या आठवणिंना उगाच विझवायला.. पुन्हा त्य...
अहम म्हणजे स्वार्थ हा एकांगी विचार सोडुन त्याचा अर्थ स्वत:च्या अस्तित्वात आणि जन्म ते मृत्युपर्यंतच्या प्रवासात शोधन हादेखील असु शकतो.जगाकडे बघता बघता आपल्यामध्येहि एक स्वतःच जग तयार होत असत. त्यात आपुलकीच्या माणसांची घर,स्वप्नांचे आकाश,दररोज येणारे गोड आणि कटु अनुभव,घुसमट,भावनांचा उद्रेक अशा असंख्य गोष्टींनी आपल जग आपण बनवत असतो.ह्याच आपल्यातल्या अहम च्या जगाला कवितांच्या स्वरूपात मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्हीदेखील शोधुन बघा तुमच्यातल्या अहममध्ये मध्ये तुम्ही तयार करत असलेले जग.